नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमधील मेयो रुग्णालयातील कोरोनाचे चार संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पुणे, मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये सापडले आहेत.
नागपुरातील चार कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. नागपुरात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे चार संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज येणार आहे, त्यापूर्वीच हे चारही जण शुक्रवारी मध्यरात्री रुग्णालयातून बेपत्ता झाले. ते सर्व आपापल्या घरी गेले असून आज त्यांना परत रुग्णालयात आणले जाणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या ३ झाली आहे.