Home राज्य अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली ; सर्व प्रवासी सुखरुप

अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली ; सर्व प्रवासी सुखरुप

0
40


मुंबई (वृत्तसंस्था) गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट आज सकळी बुडाली. सुदैवाने बोटीतील सर्व ८८ प्रवाशी सुखरूपरित्या बचावले आहेत.

 

अंजठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी होते. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८० प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.


Protected Content

Play sound