यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला असून याची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी केले. ते येथे अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत बोलत होते.
यावल शहरातील अल्पसंख्यांक समाजास कोरोना संदर्भात प्रशासनाची भुमिका व आरोग्याच्या विषयाला घेवुन समाजामध्ये निर्माण झालेले गैरसमज या विषयाला घेवुन यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी काल सायंकाळी तातडीची बैठक बोलवली होती. याप्रसंगी निरिक्षक धनवडे म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाने तालुक्यातील बाधीतांची संख्याही आज रोजी ६८वर पहोचली असुन ही बाब अत्यंत घातक व आपण सर्वांच्या चिंता वाढवणारी आहे. आपण या मानवी जिवनाला घातक ठरणार्या आजारास आपण जातीभेद च्या दृष्टीने न बघता आपण आणी आपले गाव आपले कुटुंब सुरक्षीत कसे ठेवता येईल याची सामाजीक दृष्टीकोणातुन सामुहीक जबाबदारी म्हणुन कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला सहकार्य करावे तरच आपण या घातक आजाराशी यशस्वी लढा देवुन विजय होवू.
या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, हाजी ईकबाल नासीर खान, हाजी इब्राहीम शेख चाँद, हाजी गफ्फार शाह, नगरसेवक सय्यद युनुस सय्यद युसुफ , अस्लम शेख नबी, असलम खान सुब्हान खान आदी अल्पसंख्यांक समाजाचे सामाजीक कार्यकर्ते प्रामुख्याने या वेळी उपस्थित होते. या बैठकीस यावल नगर परिषदचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी ही उपस्थित राहुन नगर परिषदची भुमिका व नागरीकांचे सामाजीक कर्तव्य या विषयातुन आपले मनोगत व मार्गदर्शन केले.