Home आरोग्य कोरोनाची लागण झालेले पर्यटक २१५ भारतीय संपर्कात आले : राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोनाची लागण झालेले पर्यटक २१५ भारतीय संपर्कात आले : राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती


जयपूर (वृत्तसंस्था) इटलीमधून राजस्थानमध्ये आलेल्या पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले असून हे सर्व पर्यटक २१५ भारतीयांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी सभागृहात दिली आहे.

 

इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. हा भारतीय त्यांचा टुरिस्ट गाइड म्हणून काम करत होता. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतात करोनाचे एकूण २८ रुग्ण जणांना कोरोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.


Protected Content

Play sound