कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी घातक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गेल्या वर्षी कोरोना आला त्या काळात जास्त मुलांना संसर्ग झाले नाही. परंतु या दुसर्‍या लाटेत विषाणूचा नवा व्हेरिएंट B.1.1.7 आणि B.1.617 मुलांसाठी धोकादायक आहे मोठ्या संख्येने लहान मुलांना संसर्ग झाल्याचे दिसून येते. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण  आहे.

 

नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव म्हणतात, “कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत  आहे.” गेल्या वर्षी, जेथे बहुतेक मुले एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

ताप ,  सर्दी आणि खोकला ,  कोरडा खोकला ,  जुलाब ,  उलटी होणे ,  भूक न लागणे ,  जेवण नीट न जेवणे ,  थकवा जाणवणे , शरीरावर पुरळ उठणे ,  श्वास घेताना अडचण  अशी हि लक्षणे दिसतात

 

मुलामध्ये कोविड-19 संसर्गाची लक्षणे  दिसल्यास  लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करा.  उशीर करू नका. उपचार लवकर सुरू करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात.

 

हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार बर्‍याच मुलांमध्ये कोरोना विषाणूमुळे एक गंभीर  गुंतागुंत पहायला मिळत आहे, ज्याला मल्टिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन म्हणतात. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, पचनाशी संलग्न अवयव किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या असू शकते.

 

मुलास कॅविड संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यास आणि डॉक्टरांनी मुलास घरात अलिप्त राहण्याचा सल्ला दिला तर मुलाला घरात इतर लोकांपासून दूर ठेवा. शक्य असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांकडून मुलासाठी स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुमची व्यवस्था करा. संक्रमित मुलाची काळजी घेताना, पालकांनी डबल मास्क घालावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत

Protected Content