नवीदिल्ली, वृत्तसंस्था | जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. भारतातही काही राज्यांमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. चीनमधून सगळीकडे पसरत असलेला हा आजार भारतात आणखी पसरू नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. जे परदेशी नागरिक १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आले, अशा नागरिकांना सध्या देशात येऊ द्यायचे नाही, असे फर्मान भारतात काढण्यात आले आहे.
चीनमधून हवाई, रस्ते किंवा समुद्री मार्गाने येण्याची परदेशी किंवा चिनी नागरिकांची सगळेच दारे सध्या बंद करण्यात आली आहेत. नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार अशा चारही देशांतून रस्त्याच्या मार्गाने येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
चीनचा पासपोर्ट असणाऱ्या सगळ्यांचा भारतीय व्हिसा सध्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याच मार्गाने भारतात येता येणार नाही. ५ फेब्रुवारी २०२० पूर्वी काढलेला ई-व्हिसा असो वा नियमित व्हिसा असो कोणत्याही चिनी नागरिकाला सध्या भारतात प्रवेश मिळणार नाही, असे आदेश नागरी उड्डयन महासंचालकांनी काढले आहेत. जगात कोठेही राहणारे चीनचे नागरिक किंवा चीनमध्ये राहणारे परदेशी नागरिक आणि १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आलेले परदेशी पर्यटक यांना भारतात प्रवेश दिला जाणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.
इमर्जन्सीत काय करणार?
भारतात येणे अत्यावश्यकच असेल तर त्यांना बिजिंगमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. ते शक्य नसल्यास शांघाय आणि गुआंगझू येथे नव्या व्हिसासाठी अर्ज करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कुणाला असेल सूट ?
विमान कर्मचाऱ्यांना ही भारतात येण्याची बंदी लागू नसेल. मग, ते चिनी नागरिक असो वा इतर कोणत्याही देशाचे नागरिक असो, त्यांना चीनमधून भारतात येता येईल.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news