जालना (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसवर अद्याप जगात कोणताही कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसताना कोरोना व्हायरसची लस देऊन आर्थिक लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बोगस डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तहसिल येथील पिंपळगावात तीन महिलांनी लोकांना, कोरोना व्हायरसवरील लस देण्याचा प्रकार समोर आला आहे. या तीन महिलांपैकी एक महिला स्वत:ला डॉक्टर सांगत होती. तर इतर दोघींनी तिच्या सहाय्यक असल्याची बतावणी करत होते. या महिला पिंपळगावात पोहचल्यानंतर कोरोनाच्या नावाखाली आधीच घाबरलेल्या लोकांना लस देण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात या महिलांनी पैसेदेखील उकळले. या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवर बाजारात कोणत्याही प्रकारचे औषधं उपलब्ध नाही.