कोरोनाचा प्रतिकार एकत्रीतपणे करू या- शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार सर्वांनी एकत्रीत मिळून करण्याचे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले आहे.

काल देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. यानंतर सायंकाळी पाच वाजता पंतप्रधानांच्या निर्देशानुसार सर्वांनी आपापल्या घरी टाळ्या वाजवून व थाळीनाद करून कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सहभाग घेतला. ते आणि त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांनी या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी आज सकाळी एक ट्विट करून लोकांचे आभार व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रतिकार एकत्रीतपणे करण्याचे आवाहनदेखील पवार यांनी केले आहे.

Protected Content