रक्ताचा तुटवडा, नागरिकांनी रक्तदान करावे ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते.

 

राजेश टोपे यावेळी म्हटले की, कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करु नये, असे काहीही नाही. रक्तदान केल्याने कुठलाही धोका नाही. रक्तदात्यांना नम्र विनंती करेन, जमावबंदी आदेश लागू असेल, तरी रक्तदान सुरुच राहणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम शिथिल करता येणार नाही. त्यामुळे फार गर्दी न करता रक्तदान करा. रक्तदान ही आपली सामाजिक जबाबदारी तर आहेच. पण आजची ही गरज झालेली आहे, वेळेची मागणी आहे, असेही टोपे म्हणाले. तसेच ब्लड बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजपासून १०-१५ दिवस पुरेल एवढेच रक्त या बँकेत शिल्लक आहे. सगळ्यांना आवाहन आहे आणि ब्लड बँकेनेही दखल घ्यावी की, मोठ्या संख्येने ब्लड कलेक्शनचे काम करावे,असेही टोपे यांनी सांगितले.

Protected Content