धुळे (प्रतिनिधी) धुळे शहर आणि शिरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून धुळ्यात आज जनता सक्तीची संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला होता.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 162 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात धुळे शहरात सर्वाधिक 102 तर शिरपूरमधे 37 कोरोनाबाधित आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 19 जणांनी आपला जीव गमावला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने धुळ्यात आज जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, धुळे शहरातील 49 कंटेन्मेंट झोनमध्ये ही संचारबंदी सक्तीने पाळण्यात येणार असून शिरपूरमध्ये देखील संचारबंदी लावण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर तीव्र झाल्याचे बघायला मिळत आहे.