कोरोनाचा आजचा डाव १५ वर थांबला ; ९ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७५  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ९  तालुक निरंक असल्याचे दिसून आले आहे. 

 

जिल्हानिहाय आकडेवारी

जळगाव शहर -४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा -१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण  १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ३५६  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार २७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५०९  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज जळगाव ग्रामीण व नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

Protected Content