कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कात आलेल्या तब्बल ११ जणांचा ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ही आता ७८ वर जाऊन पोहचली आहे. यातील तिघा जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

 

निगडी परिसरात गुरुवारी एका २६ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या तरुणाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या २५ जणांना महापालिका रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले होते. या सर्वांचे कोरोना अहवाल सकाळी प्राप्त झाले. यातील तब्बल ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन वर्षीय दोन चिमुकल्यांसह सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरुष आणि महिला या तीस वर्षाच्या आतील आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content