कोरोनमुक्तीनंतर अशक्तपणा , एखादा अवयव खराब होण्याचा त्रास

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । भारतामधील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांचं देशातील प्रमाण (रिकव्हीर रेट) ७७.७७ टक्क्यांवर आहे. शनिवारपर्यंत देशभरात एकूण ३७ लाख दोन हजार ५९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण वाढत असले तरी एक गंभिर समस्या समोर आली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना आरोग्याच्या समस्या दिसत आहेत. अशक्तपणा किंवा शरिराचा एखादा भाग खराब होणं यासारख्या समस्या कोरोनामुक्त होणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये दिसत आहेत.

या समस्यांना समोर ठेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनामुक्त झालेल्यांसाठी काही सुचना आणि उपाय (पोस्ट कोविड-19 केयर प्रोटोकॉल) सुचवले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी नियमित मॉर्निंग वॉकला किंवा सायंकाळी चालायला जावं. दररोज योग अभ्यासही करावा. नियमित चवनप्राश, हळदीचे दुध, गिलोय पाउडर, अश्वगंधासारख्या रोगप्रतिराकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. दररोज सकाळी कोमट पाण्यानं गुळणी भरावी आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी. सहज पचेल अशा संतुलित अन्नाचं सेवन करावं

या सुचनेमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांना आयुष औषधं घेण्यासही सांगितली आहेत. ही औषधं फक्त रजिस्टर्ड डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळतील. ज्यांचा घसा खरखर करतो त्यांनी नियमित कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचं पालन करावं. कोमट पाण्याचं सेवन करावं. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं नियमित सेवन करावं.

Protected Content