भुसावळ प्रतिनिधी । शांतीनगर भागात कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झालेल्या रूग्णाचे कुटुंबिय व त्यांच्या संपर्कातील इतरांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे.
याबाबत वृत्त असे की, शांतीनगर भागातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वीच निष्पन्न झालेले आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कता म्हणून त्या व्यक्तीचे कुटुंबिय तसेच संपर्कातील पाच जणांची तपासणी केली आहे. त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले असून आज त्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.