पाचोरा प्रतिनिधी । शहरात तीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील एकाचा आज मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून बाधितांच्या संपर्कातील आलेल्यांची आता तपासणी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.
आज सायंकाळी पाचोरा येथील एक कोरोना बाधीत उपचार सुरू असतांना मृत्यूमुखी पडला. दरम्यान, काल रात्रीपासूनच प्रशासनाने तिन्ही पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यास प्रारंभ केला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्याने पीपीई ची किट परीधान करुन या दोघा जिगरबाज वैद्यकीय अधिकारी यांनी जवळपास १५ कोरोनटाईन असलेल्यांचे नमुने घेतले आहे. या सर्वांची चाचणी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कातकाडे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जमा करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यास प्रारंभ केला आहे. तर आरोग्यदूत सचिन सोमवंशी यांनी प्रशासनाला मदत केली आहे.