कोरपावली येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्राम पंचायतीच्या वतीने सिद्धार्थ नगर व कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयात महामावव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

 

कोरपावलीचे सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या हस्ते पूजन करून व त्यांना बौद्धवंदना देवुन विनम्र अभिवादन करण्यात आले. सिद्धार्थ नगर कोरपावली येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस सुनील भास्कर अडकमोल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस देविदास नागो तायडे यांनी पुष्पहार अर्पण केली. कोरपावली येथील सिद्धार्थनगर परिसरातील फलकावर युवा समाजसेवक मुक्तार पटेल व भिमराव इंधाटे यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली. याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, दीपक नेहेते ग्रामस्थ सिकंदर तडवी, जुम्मा तडवी, नागो तायडे, केशव अडकमोल आकाश अडकमोल, प्रवीण आढळे, सिद्धार्थ अमोल जयवंत अडकमोल चंद्रकांत तायडे सागर तायडे, विनोद अडकमोल सागर अशोक अडकमोल तसेच ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी यांच्यासह ग्रामस्थांची मोठया संख्येत उपस्थिती होती.

Protected Content