कोरपावली ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

 

: यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महीला व तरुणांना संधी मिळाली आरक्षण सोडतीत प्रथमच अनुसुचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्याने सरपंच होण्याचा बहुमान मागासवर्गीय तरुणास मिळाला आहे .

कोरपावलीच्या सरपंचपदासाठी काँग्रेसप्रणीत पॅनलचे उमेदवार तरूण विलास नारायण अडकमोल या एकमेव सदस्यांच्या नांवावर शिक्कामोर्तब झाले आहे यावेळी कोरपावली ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला नवनिर्वाचित सरपंच व ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा मिडीया प्रमुख विलास अडकमोल यांच्यासह पॅनलप्रमुख पिरन पटेल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष व दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणुन बिनविरोध निवडुन आलेले जलील पटेल , मसाकाचे माजी संचालक बारसु नेहते , सामाजीक कार्यकर्ते नारायण अडकमोल, ईस्माईल तडवी , ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी , आरीफ तडवी , हमीदाबी पटेल , हुरमत तडवी, अफशान तडवी , मुक्तार पटेल , काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, शिवाजी नेहते , जावेद पटेल , महमद पटेल , ईस्हाक पटेल यांच्यासह ग्रामस्थांनी पिरबाबा गैयबन शाह यांच्या दर्गावर दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले .

Protected Content