यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे मागील आठवड्यात येथे १८ मे रोजी गावातील दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांच्या संपर्कातील ५० लोकांना फैजपूर येथे जेटीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नयेयासाठी कोरपावली ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.
कोरपावली ग्रामपंचायतीने कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी म्हणून १४ व्या वित्तआयोगामधून प्रत्येक कुटुंबाला १ सेनेटायझर आणि २ मास्क असे एकूण ७५० बॉटल आणि १५०० मास्क वाटप केले. यावेळी परभणी येथील तुळशीदास कोलंबे, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, इस्माईल तडवी, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य जलील पटेल,तलाठी मुकेश तायडे, ग्रा.प. सदस्य राजेंद्र पाटील, मुनाफ तडवी, कय्युम पटेल, जावेद पटेल, इसाक पटेल, सादिक पटेल, किसन तायडे, हर्षल महाले, शालिनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमृत पाटील, भगवान नेहेते, आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोरपावली ग्रामपंचायतीने कोरोनाच्या संकटसमयी ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.