भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात रसायनशास्त्र व कॉम्प्युटर सायन्स विभागातर्फे फ्रेशर्स पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.
एम.एस.सी. रसायनशास्त्र व कॉम्प्युटर सायन्स द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थिनींनीचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टी चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एच. पी. नारखेडे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. जे. व्ही. धनविज यांनी आापल्या मार्गर्शन पर भाषणात नवीन प्रवेशित विद्यार्थिनींना महाविद्यालयामध्ये असलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच. तसेच महाविद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत सांगितले की आपल्या शिक्षकांशी जवळीक साधा ,त्यांचे योग्य मार्गदर्शन घ्या, त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्या, महाविद्यालयामध्ये असलेल्या लायब्ररीचा पुरेपूर उपयोग करा ,जास्तीत जास्त पुस्तके वाचून आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. आणि समाजासाठी आपलं देणं लागतं या भावनेने सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी काम करा असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन रसायनशास्त्र द्वितीय वर्गाच्या दिपाली पाटील व भविका पाटील यांनी केले तर आभार नीता अहिरराव हीने मानले. एमएससी प्रथम वर्षाच्या हर्षा माळी व भाविका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विज्ञान विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.