जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेशचे पदाधिकारी डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी व जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार व यांचा जिल्हा दौरा दिनांक ५ ते १७ पर्यत आयोजित करण्यात आला आहे.
उद्यापासून आयोजित जिल्हा दौऱ्यात प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार उल्हास पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेन्द्रसिंग पाटील,सचिव विनोद कोळपकर, अॅड.संदीप भैय्या पाटील तसेच जिल्ह्यातील नेते जिल्हातील सर्व अध्यक्ष फ्रंटलचे व सेलचे सर्व अध्यक्ष सहभागी होणार आहेत.
५ डिसेंबर दु.१:०० वा अमळनेर , ६ डिसेंबर दु.१:०० वा भडगाव, ७डिसेंबर सकाळी १०:००वा भुसावळ शहर/ग्रामीण, ८ डिसेंबर दु.२:०० वा चोपडा, ९ डिसेंबर दु.०४:०० वा रावेर, १० डिसेंबर दु.०१:०० वा एरंडोल, ११ डिसेंबर दु.०१:०० वा जळगाव ग्रामीण, १२ डिसेंबर दु.०१:०० वा जामनेर, १३ डिसेंबर दु.०१:०० वा मुक्ताईनगर, १४ डिसेंबर दु.०१:०० वा पाचोरा, ५) १५ डिसेंबर दु.१२:०० यावल तर १७ डिसेंबर दु.०१:०० वा पारोळा दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तालुकाध्यक्ष व शहरात ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.