के-हाळा गावात घराचा स्लँब कोसळून युवकाचा मृत्यू

रावेर : प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील के-हाळा येथील वैभव वासुदेव महाजन यांच्या घराच्या पायाचे खोदकाम सुरू असताना अचानक घराचा स्लँब कोसळून के-हाळा खुर्द येथील फिरोज रूबाब तडवी (वय 30) हा गभीर जखमी झाला होता रावेर ग्रामीण रूग्णालयात डाँक्टरानी त्याला मृत घोषीत केले

फिरोज,तडवी हा अत्यंत कष्टाळू होता त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे त्याच्या पश्चात आई, पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता अत्यंत मनमिळावु स्वभावाचा फिरोज गेल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे फिरोज यांची मुले लहान आहेत .

Protected Content