Home क्रीडा केसीई शिक्षणशास्त्र रग्बी फुटबॉल स्पर्धेत विजयी

केसीई शिक्षणशास्त्र रग्बी फुटबॉल स्पर्धेत विजयी

0
40

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन रग्बी फुटबॉल स्पर्धेत शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.

 

व्ही. एस. नाईक कॉलेज रावेर येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन रग्बी फुटबॉल (पू) स्पर्धेत केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने अंतिम लढतीत सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम लढतीत व्ही. एस. नाईक कॉलेज संघाचा शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने २०-१० ने पराभव करीत जेतेपद पटकाविले. विजयी संघात परीक्षित बोरसे, कुणाल भट, रितेश सोनवणे, अमोल पवार, जितेंद्र वानखेडे, गिरीश खोडके, राहुल देवरे यांचा समावेश होता. संघास प्रा. अतुल गोरडे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या विजयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीपकुमार केदार, प्रा.प्रविण कोल्हे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound