जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई अभियांत्रिकीत महाविद्यालयात पुणे येथील नामांकित कंपनी द्वारे कॅम्पस मुलाखती संपन्न करण्यात आल्या ज्यात विविध विभागातून ऐकून १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातील १६ विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर अभियंता पदासाठी निवड झाली व त्यांना ऑफर लेटर देण्यात आले.
मुलाखतीच्या सुरवातीला विद्यार्थ्यांना पूर्व सूचना देण्यांत आल्या त्यानंतर ऑनलाईन योग्यता चाचणी घेण्यात आली. जे विद्यार्थी चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांना मुलाखती साठी बोलाविण्यात आले. यावेळी मुलाखती घेण्यासाठी पुणे येथून अतुल सागर, मनोज पडघम आणि मयांक यादव उपस्थित होते. के सी ई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. ओ. दहाड यांनी मुलाखती साठी उपस्थित पुणे येथील मान्यवरांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे ट्रैनींग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मनोज दामोदर साळुंके यांनी प्रा.महेंद्र पवार, प्रा. लीना वाघुळदे, प्रा. वैशाली सरोदे , प्रा. राजेश वाघुळदे यांच्या मदतीने सर्व व्यवस्थापन सांभाळले.