यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणीचे निवेदन यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी बजाज आलियांज कंपनीकडे 2020 वर्षासाठीच्या केळी पीक विमा काढला होता, मे आणि जून महिन्यांमध्ये झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले, तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी वेळेत कंपनीला तक्रार नोंदवली, नोंदवलेल्या तक्रारी प्रमाणे कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी सहाय्यक यांनी पंचनामे केले, परंतु आता कंपनीने शेतकऱ्यांचे दोन गट केले आहे, एका गटाचे पैसे दिले आणि राहिलेल्या गटाचे बद्दल विचारणा केली असता पंचनामा झाली नाही, असे उत्तर देण्यात आले. तरी उर्वरित शेतकऱ्यांना केळी विमाची रक्कम तातडीने अदा करण्यात घेण्याच्या सूचना कंपनीला देण्यात याव्यात, अशी मागणीचे निवेदन खा.रक्षाताई खडसे यांना यावल पंचायत समितीचे उपसभापती तथा गटनेता दीपक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, पंचायत समितीचे गटनेते दीपक पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष उर्जित चौधरी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुका सरचिटणीस विशाल चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.