भडगाव – धनराज पाटील | तालुक्यातील मोठे केळी उत्पादक गाव असणार्या पिचर्डे येथील शेतकर्यांना यंदा पिक विम्यातून वगळण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. याबाबत तात्काळ शेतकर्यांना दिलासा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
भडगाव तालुक्यात अति तापमानामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील आंबे बहार,केळी पिकाविमा जवळपास १ हजार ७ शेतकरी बंधुंनी काढला आहे. मे महिन्यात तापमान हे जवळपास ४५ डिग्री पेक्षा जास्त होते. तसेच हे तापमान ११ मे तर १५ मे पर्यंत सलग ५ दिवस ४५ डिग्री तापमान होते. पिचर्डे गावात केळीचे पोग्याचे तीन ते पाच पाने करपली म्हणजेच सलग १० तए१५ दिवस उच्च तापमान होते हे सिध्द झाले आहे.
असे असतांनाही भडगाव महसूल मंडळातील फक्त ११ गावे बसली त्यात कजगाव, कोळगाव,आमडदे महसूल मंडळातील गावे घेतली नाही असा दुजा भाव का केला ? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. तसंच कजगाव व कोळगाव महसूल मंडळातील पिचर्डे,पांढरद, बात्सर परिसरातील या गावात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाविमा शेतकरी वर्गाने काढला आहे. नुकसान ही मोठ्या प्रमाणात झाले आहे मग हे गाव का पीक विमा साठी का पात्रं ठरली नाही ? या गावापासून अगदी दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेले गावे बसले मग आमच्या वरच का अन्याय ? असा सवाल शेतकरी वर्ग करत आहे. असं का झालं यात काही गावांमध्ये कंपनी प्रतिनिधी ने कोणत्या आधारावर आपला सर्वेक्षण केले आहे त्यांना च माहिती ! सर्वात जास्त नुकसान या भागात झाले व केळी याच भागात जास्त मग बाजुच्या गावात लाभ व आम्हाला का लाभ नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. जर बाजूला गावात ४५ डिग्री तापमान मग आमचं गावे हे थंड हवेचे ठिकाण आहे का कुषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी सांगतात वरून बाकीचे गावे च नावे आले नाहीत मग भडगाव मंडळातील गावे कसे आलेत ? लवकरच लवकर आमचे गावे पिकविमा लाभ साठी घ्या नाहीतर आम्ही हक्कासाठी लढत राहु व येत्या काही दिवसांत कुषी विभाग ला निवेदन देऊन आम्ही उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
या संदर्भात तालुका कुषी अधिकारी बी.बी.गोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केळी पिकाच्या आंबे बहारासाठी कमी तापमान, वेगाचा वारा व जास्त तापमान हे पिक विम्यासाठी निकष आहेत. सदर निकषांचा अंतिम कालावधी ३१ मे रोजी पूर्ण झालेला असून सदर कालावधीनंतर ३० दिवसात विमा कंपनीकडून विमा मंजुरी बाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. अद्याप विमा कंपनी कडून महसूल मंडळ निहाय विमा मंजूरीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही असे ते म्हणाले.
तर या संदर्भात कंपनीचे प्रतिनिधी विष्णू खेडेकर म्हणाले की, अजून एका महिन्यात गावांची आकडेवारी येईल व तेव्हाच सांगता येईल कोणत्या मंडळातील कोणते गावे पात्र झाले असेल अजून अधिकृत माहिती माझ्या कडे आली नाही कंपनी जे मंडळ पात्र केले त्यांना मदत मिळेल.