धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अभिनेत्री केतकी चितळे व अॅड. नितीन भावे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजेंद्र जगन्नाथ वाघ (माळी) यांनी पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात समाज माध्यमात अत्यंत खालच्या शब्दात महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, संस्कृतीला न शोभणारी अभंग सदृश्य पोस्ट केतकी चितळे नामक एका विकृत अभिनेत्रीने समाज माध्यमावर केली आहे. तसेच त्या पोस्ट चा लेखक अॅड. नितीन भावे आहे. श्री. शरदचंद्र पवार यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे. त्याच प्रमाणे त्यांचे भारतभरातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान आहे. मात्र केतकी चितळे हिने त्यांच्या आजाराबाबत जगतगुरु तुकाराम महाराजांचे नाव घेऊन अत्यंत विकृत स्वरूपाचे लिखाण केले गेले आहे. ह्या लिखाणात फक्त शरद पवारांचाच अपमान नाही तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात ज्या-ज्या महनीय व्यक्तींनी सबंध आयुष्य खर्ची केले त्यांच्याही अपमान आहे. त्यामुळे केतकी चितळे व समाज माध्यमावर प्रसारित केलेला. अभंग सदृश्य मजकुराचा लेखक अॅड. नितीन भावे ह्या दोघांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी निवेदाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बाळासाहेब जाधव, देवानंद चव्हाण, ओंकार माळी, नगर मोमीन , करीम लाला नेमीन, जितेंद्र पाटील, रवींद्र माळी, श्रीकांत सोनवणे,विकास पाटील, सुनील देशमुख, आकाश बिवाल , अयुब खान, दीपक महाजन, विक्रांत सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहे.