नवी दिल्ली । नवी दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनास मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या तयारीवरून काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी टीका करत केंद्र सरकारने पूल बांधावेत, भिंती नव्हे असा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड तयारी केली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खिळे टाकण्यात आले आहेत तर काही मार्गांवर भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. केंद्र सरकारने पूल बांधावेत. भिंती नव्हे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमधून लगावला आहे. तर, पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.