केंद्रीय यंत्रणेचा दुरूपयोग थांबवा; रावेरात राष्ट्रवादीचे जोरदार निदर्शने

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देशात व महाराष्ट्रात ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणा यांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी रावेरात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आक्रमक होऊन केंद्र व राज्य सरकारविरुध्द जोरदार निदर्शने करून तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देऊन चौकशी करीता बोलविले याचा निषेध म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दबाव तंत्राविरुध्द रावेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे जोरदार निदर्शने करून तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, प्रदेश सेलउपाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, रावेर बाजार समिती संचालक राजेंद्र चौधरी, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मुकेश येवले, वसंत पाटील, समाधान पाटील, पवन जैन, प्रविण पाटील, शेख सलिम, सचिन पाटील आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content