केंद्रीय कर्मचारी निधीमार्फेत रेल्वे कर्मचाऱ्यांना औषधींचे वाटप

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेल्वे भुसावळ मंडळाद्वारे कोरोना संक्रमणाच्या काळात जे कर्मचारी आजही आपले कार्य आणि सेवा निष्ठेने करीत आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

रेल्वे कर्मचारी रेल्वेने सुरू केलेल्या प्रवासी आणि माल वाहतूक गाड्यांवर कार्यरत आहेत तसेच अत्यावश्यक सेवा देण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत अशा भुसावळ मंडळातील दहा हजार कर्मचाऱ्यांना व्हिटॅमिन सी गोळ्यांचे वाटप केंद्रीय कर्मचारी निधी मार्फत करण्यात आले. यासाठी डीआरएम विवेक कुमार गुप्ता , एडीआरएम मनोज कुमार सिन्हा , वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content