केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने पसरत आहे. सामान्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री   प्रकाश जावडेकर यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

 

 

जावडेकर यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी   पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी. असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

Protected Content