केंद्राचा निर्णय : सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून इतरमागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

आर्मी ही एकमेव संस्था आहे जिथे आरक्षण लागू नाही. सैनिक स्कूलमध्ये २७ टक्के राखीव याचा अर्थ भावी अधिकार्‍यांसाठी अप्रत्यक्ष आरक्षण लागू होत आहे. १०% आर्थिक आरक्षण जेव्हा केंद्रात आलं तेव्हा ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा होती. पण तेव्हाही लष्करानं स्पष्ट केलं होतं की ते लागू करणार नाही.

सध्या सैनिक शाळांमधल्या ६७ टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित प्रदेशातील मुलांसाठी असतात तर ३३ टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात. आता या दोन कॅटॅगरीमध्ये जनरल, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे.

सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी २७ टक्के जागा या विद्यमान कोट्या व्यतिरिक्त असतील. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार आहेत. या कोट्यासंदर्भात सर्व शाळांच्या प्राचार्यांना १३ ऑक्टोबर रोजी आदेश देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Protected Content