जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील कृष्ण सखी महिला बचत गट व महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ७५ वा स्वातंत्र्य दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला.

कृष्ण सखी महिला बचत गट व महीला व बालकल्याण विभागातर्फे सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवा दलाचे प्रसिद्धीप्रमुख राजू बाविस्कर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सरस्वती मातेची पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कृष्ण सखी महिला बचत गट अध्यक्ष रूपाली बाविस्कर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचत गटातील महिला रूपाली राजू बाविस्कर प्रतिभा पाटील नलिनी सोनवणे पुनम सपकाळे यांचे सहकार्य लाभले