जळगाव प्रतिनिधी । पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी तालुक्यातील कुसुंबा येथील दाम्पत्याचा खून केल्याच २४ एप्रिल रोजी दुपारी उघडकीला आले होते. या गुन्ह्यातील अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी अरूणाबाई वारंगणे हिचा जामीन आर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
तालुक्यातील कुसुंबा येथे ओमसाई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी 24 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. आशाबाई यांचा मृतदेह किचनच्या बाजूच्या खोलीत, तर मुरलीधर यांचा मृतदेह गच्चीवर होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून देविदास नामदेव श्रीनाथ, अरुणाबाई गजानन वारंगणे, सुधाकर रामलाल पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यातील संशयित आरोपी अरुणाबाई वारंगणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज शुक्रवारी न्या. एस. जी. थुबे यांच्या न्यायालयात काजकाज झाले असता, त्यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.