कुसुंबा येथील गँग वारमधील एकास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून १३ सप्टेंबर रोजी दोन गटात तालुक्यातील कुसुंबा येथे गँग वार झाला होता. यातील आज एकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. राकेश भिमराव सपकाळे (वय-२०) रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अशी आहे घटना, मित्राच्या अंत्ययात्रेला आलेल्या देान गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून आला. अंत्यविधीत एकमेकांकडे बघण्यावरून देान्ही टोळ्यांमध्ये लोखंडी रॉड, चॉपर, चाकू लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारी झाली होती. जखमी विशाल अहिरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल, किरण गव्हाणे, आशू मोरे, विशाल पाटील, दीपक तरटे हे अंत्ययात्रेतून परतत असताना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या किरण खर्चे, आकाश परदेशी याच्यासह काही तरुणांनी चॉपरने विशालवर वार केले. या फिर्यादीवरून किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसऱ्या फिर्यादीत जखमी किरण खर्चे याने दिलेल्या जबाबनुसार, अंत्ययात्रेतून घरी परतत असताना विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांनी किरणसह मित्रांवर हल्ला चढविला. याचवेळी विशाल अहिरे याने किरणच्या डोक्यावर व कानावर चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी किरण चितळे याने किरण खर्चेला तात्काळ रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संशयित आरोपी राकेश सपकाळे हा राहत्या घराकडे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश पाटील, विजय बावस्कर, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी राकेश सपकाळे याला अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content