यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांनी आपल्या पदभार स्विकारले असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावल तहसील अंतर्गत कार्यरत असलेले किनगाव विभागाचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांची किनगाव येथून यावल तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर कुळकायदा अव्वल कारकुन पदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर तहसीलमध्ये कुळकायदा अव्वल कारकुन म्हणुन चार वर्ष कार्यरत असलेले रवींद्र भगवान माळी (रा. लासुर तालुका चोपडा) यांची चोपडा तालुक्यातीलच हातेड विभागाचे मंडळ अधिकारी म्हणुन बदली झाली आहे. दिनांक ३१ मेच्यापुर्वी संबधीत अधिकाऱ्यांनी आपल्या बदली करण्यात आलेल्या विभागाचे पदभार स्विकारावे असे महसुल प्रशासनाच्या वतीने आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे .