भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . रुग्णांची संख्या सात झाली असून यातील तीन रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र गावात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य व पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली गावात टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला होता . कुऱ्हे ( पानाचे ) येथे मात्र जुलै महिन्यापर्यंत एकही रुग्ण न होता. जुलै महिन्यातील मध्यंतरीच्या काळात व तीन ऑगस्टपर्यंत सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे . यातील तीन रुग्ण सुधारले असून ते घरी आले आहेत . चार रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील व मित्र मंडळ यांनी यापूर्वी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते . त्यांनी गावात गोळ्यांचे वाटप केले होते. तर पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील , पत्रकार उत्तम काळे, ग्रामपंचायत माजी सदस्य जितेंद्र नागपुरे , राजू भगत , एकनाथ धांडे , संजय कोळी , राहुल पाटील , प्रदीप शिंदे , अमोल पाटील, बापू भागवत शिंदे , पद्माकर पाटील, अजय कोळी, राहुल पाटील , कृष्णा सूर्यवंशी , सोमनाथ मस्के , वाल्मीक आहिर व मित्रमंडळातर्फे फवारणी प्रारंभ करण्यात आला आहे. याकामास नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांचे सहकार्य मिळात आहे.