कुऱ्हा येथील माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा येथील स्व. अशोक फडके माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात  ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.

 

यावेळी योग शिक्षक योगेश नेटके सरांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या होणारे फायदे सांगितले व विध्यार्थ्यांकडून विविध योग प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले.

संस्थेचे उपाध्यक्ष तथा बेटी बचाव-बेटी पढावचे केंद्रीय संयोजक राजेंद्र फडके यांनी आपल्या मनोगतातून योग दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योग आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात झाला आहे.

 

आजच्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग्दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघात मा.नरेंद्रजी मोदी योग दिनाचे नेतृत्त्व करीत आहेत. आपणसुद्धा दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा व निरोगी जीवन

जगावे असा संदेश राजेंद्र फडके यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी सर शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एस. चौधरी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकावृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content