कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं

नागपूरः वृत्तसंस्था । कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं आहे. वैदिक परंपरा त्यांना मान्य करावी लागेल. अशी वक्तव्यं समाजात विघटन घडवून आणतात, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींना दिला आहे.

नागपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ओवेसींना त्यांनी खडे बोल सुनावले.

“राजकीय शक्ती एकाच धर्माकडे किंवा समाजाकडे राहील या खोट्या धारणेवर हिंदुत्वाची प्रतिमा उभी केली आहे. शिवाय मुस्लिमांना राजकारणात भाग घेण्याचा कोणताही हक्क असू नये, असंही त्यातून दर्शवण्याचा खोटा प्रयत्न आहे. संसद किंवा विधिमंडळातील आमचं संख्याबळ हे हिंदुत्व आणि संघाला आव्हान आहे. आमचं अस्तित्व रोखल्यास संघ नक्कीच त्याचा उत्सव साजरा करेल”, असंही ट्विट ओवेसींनी केलं होतं. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. प्रकाश आंबेडकरांनीही ओवेसींचं हे विधान खोडून काढलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनीही ओवेसींवर पलटवार केला होता. हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होतं हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक समाधानाने नांदत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले होते.

Protected Content