Home Cities जामनेर कुंभारी खुर्द येथील संशयितास पोलीस कोठडी

कुंभारी खुर्द येथील संशयितास पोलीस कोठडी


पहूर, ता. जामनेर, (प्रतिनिधी)। जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द येथील तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस जामनेर न्यायालयात हजर केले असता, त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे यांनी दिली.

मोटारसायकलचा खराब झालेला हॉर्न का वाजवितो? या कारणावरून १ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कुंभारी खुर्द येथे पोपट उर्फ पिंट्या सोना चव्हाण (वय ३२ वर्षे) याने गावातीलच दिपक भागचंद राठोड (वय २२ वर्षे) याचा गळा पकडून त्यास सिमेंटच्या रस्त्यावर ढकलल्याने त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबर दुखापत झाली. यातच दिपक राठोडचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी पोपट चव्हाण याच्याविरूध्द विनोद देवचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात भादंवी ३०४ अन्वये सदोष मणूष्यवधाचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आले होते. त्यास आज जामनेर न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे करीत आहेत.


Protected Content

Play sound