कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याच्या सुमारे ३० कोटी ८४ रुपये निधीच्या कामाला सुरुवात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कुऱ्हा परिसर व गावातील शेतीला वरदान ठरणाऱ्या जोंधनखेडा कुंड धरणाच्या मातीच्या भिंतीची उंची वाढवणे आणि सांडव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सुमारे ३० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तर प्रत्यक्ष धरण स्थळी माजी महसुल कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, रोहिणी ताई खडसे यांच्या पाठपुराव्याने कुऱ्हा परिसरातील जोंधनखेडा, हिवरा, उमरा, पारंबी, काकोडा व इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला वरदान ठरणाऱ्या जोंधनखेडा येथील गोरक्ष गंगा नदीवरील कुंड धरणाच्या मातीच्या भिंतीची उंची वाढवणे आणि सांडव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सुमारे ३० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

आज दि ५ रोजी संपन्न या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, प स सभापती सुनिता चौधरी, जि प सदस्य निलेश पाटील, वनिता गवळे, वैशाली तायडे, रामदास पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष बल पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले, डॉ बि सी महाजन, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनिल काटे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, विलास धायडे, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, युवक तालुकाध्यक्ष राजेश ढोले, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, व्ही जे एन टी सेल नितेश राठोड, किसान सेल तालुकाध्यक्ष संतोष कांडेलकर, हिवरा माजी सरपंच शिवा पाटील, रवी पाटील, रणजित गोयनका, इंदल राठोड, इकबार तडवी, बोदवड नगरसेवक भरत अप्पा पाटील, जाफर शेख, हकीम बागवान, कैलास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नितीन कांडेलकर यांनी मान्यवरांच्या हस्ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले “ना जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकरी बांधवांना फायदा होईल.” यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यता नोंदणी मोहिमेविषयी माहिती दिली. व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करण्याचे आवाहन केले. पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या, “२० ऑगस्ट रोजी मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जयंतराव पाटील यांना आपल्या परिसरातील सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक आठवड्यात ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा प्रश्न मार्गी लावला तसेच पंधरा दिवसात जोंधनखेडा धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी ३० कोटी ८४ लक्ष निधी मंजूर केला. हे काम पूर्ण झाल्यावर धरणाची साठवण क्षमता वाढेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात विकास कामांना निधी उपलब्ध होत आहे. नुकताच ना धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या खात्यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांसाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.” स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथराव खडसे म्हणाले, “जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी केल्या नुसार धरण्याच्या कामाला निधी उपलब्ध झाला असून आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत आहे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना बारमाही पाणी राहील भविष्यात बंद पाईप लाईन द्वारे शेतीला पाणी देण्यात येईल यातून परिसरात समृद्धी येण्यास मदत होईल येत्या काही दिवसात कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची उपलब्धता होणार असून काम पूर्णत्वास गेल्या नंतर शुभरंभाला जयंत पाटील उपस्थित राहतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील विकास कामांना निधी उपलब्ध होत असून ना हसन मुश्रीफ यांनी मुक्ताई मंदिराच्या अपूर्ण कामा साठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे ते काम पण लवकरच पूर्ण होईल”

आपण गेले तिस वर्षा पासून विविध विकास कामे केली असून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आपला सतत प्रयत्न असतो त्यासाठी पक्षाच्या, सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे परंतु स्थानिक आमदार हे मंजुर विकास कामात खोडा घालत असुन मंजूर कामांना ब्रेक लावण्याचे काम करीत आहेत तरी आपण विकास निधी आणण्यासाठी समर्थ आहोत कोणाला जर स्पर्धा करायची असेल तर विकास कामांशी स्पर्धा करावी.

असे त्यांनी विरोधकांना आवाहन केले

आपण विकास कामांसाठी पाठपुरावा करतो व ते मंजूर झाले की इतर श्रेय घेण्यासाठी पुढे येतात म्हणजे बाळ आम्ही जन्माला घालतो आणि बारसे करण्यासाठी दुसरे पुढे येतात अशी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

यावेळी ऑनलाईन प्रणाली द्वारे मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले, “गेल्या फेब्रुवारी महिन्यात परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्हयात आलो असताना एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हयातील सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार जळगाव येथे सर्व प्रकल्पाची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर रोहिणीताई खडसे यांनी दोन तीन वेळा प्रत्यक्ष भेटून निधी उपलब्ध करण्याची मागणी रेटून धरली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात मंत्रालयात परत सर्व सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीला रोहिणी खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जोंधनखेडा धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी निधीची आग्रही मागणी केली त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आज पासून प्रत्यक्ष धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचा कामाला आणि सांडव्याचा कामाला सुरुवात होत आहे. हे काम पूर्ण झाल्या नंतर धरणाची साठवण क्षमता वाढेल यातून परिसराच्या जल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा परिसरातील शेतीला बारमाही पाणी मिळण्यासाठी होईल गरज पडेल तसा आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठीआम्ही प्रयत्न करू.

राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर आम्ही निधी उपलब्ध करून देण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहोत भविष्यात मुक्ताईनगर मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल येतंय अर्थ संकल्पात सुद्धा जळगाव जिल्हयातील प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल तशी घोषणा अर्थमंत्री ना अजितदादा पवार हे बजेटमध्ये करतील.” असे त्यांनी सांगितले

या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहण्याचा प्रयत्न होता परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून कायदा करायचा असल्या कारणाने प्रत्यक्ष उपस्थित राहिता आले नाही त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात जळगाव जिल्हयातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कुऱ्हा परिसरातील शेतकरी बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Protected Content