किलबिल बालक मंदीरात विद्यार्थ्यांचा भरला ‘आषाढ मेळावा’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  के .सी .ई. सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने  विद्यार्थ्यांचा “आषाढ मेळावा” भरला होता. यात विठ्ठलाच्या रूपात कुशल कुलकर्णी, केशरी कमोदे रुक्मिणीच्या रूपात युग महाजन तुकाराम, दूर्वा बोरसे मुक्ताबाई ,रुद्र भारुडे एकनाथ ,देवांश वाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात या सर्व विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारल्या.

 

सुरुवातीला शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी  यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप झाला. विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करत फेर धरला आणि ही दिंडी हरी मंदिरापर्यंत नेण्यात आली, याप्रसंगी शाळेचे समन्वयक  चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे, रत्नप्रभा नेमाडे , तृप्ती आटाळे , कुंदा भारंबे ,शालिनी चौधरी  प्रतिभा जोशी ,मनीषा आमोदकर ,स्मिता पाटील दिपाली वाघ व कर्मचारी उपस्थित होते. काही पालकांनी आपल्या पाल्यांचे वारकरी वेशातील व्हिडिओज व फोटो शाळेत काढले.

Protected Content