बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील जामठी येथील शिक्षकाचे किराणा दुकान फोडून दुकानातील ७३ हजार ६०० रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुणाल भगवान महाजन (वय-३३, रा. जामठी ता. बोदवड) यांचे जामठी येथे किराणा दुकान आहे. २८ ऑक्टोबर सायंकाळी ६ ते २९ ऑक्टोबर सकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून किराणा दुकानातील ७३ हजार ६०० रुपयांची रोकड चोरून येण्याची समोर आले आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुणाल महाजन यांनी तातडीने बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.