रावेर प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून दोघांना शिवीगाळ करत तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शेख आसिफ शेख सत्तार (वय-३०, रा. कुरेशी वाडा, रावेर) आणि महम्मद फारूख महम्मद इकबाल हे दोघे बुधवारी सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या गप्पा मारत असतांना वाड्यातील शेख नदीम शेख नजीर (वय-२७), शेख नफिस शेख नसीर (वय-२८) आणि शेख मुस्तक शेख इसाक (वय-२९) तिघे रा. कुरेशी वाडा यांनी काहीही कारण नसतांना शेख आसिफ आणि फारूख यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दोघांवर विटा मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख नदीम आणि शेख नफिस या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास इस्माईल शेख करीत आहे.