एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रौफ भिकन पटेल (वय-३९) रा. शिरसोली नाका, जळगाव या तरूणाचे फर्निचरचे दुकान आहे. ६ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नितीन जाधव याने दुचाकी फर्निचर दुकानासमोर पार्क करून लावली होती. दरम्यान, अब्दुल पटेल यांच्या धक्क्याने दुचाकी खाली पडली. याचा राग आल्याने नितीन जाधव याने शिवीगाळ करून मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नितीन जाधव याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.
किरकोळ कारणावरून दुकानदाराला जीवेठार मारण्याची धमकी
3 years ago
No Comments