किरकोळ कारणावरून तरूणाला काठीने मारहाण; बोदवड पोलीसात गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील गोळेगाव येथील तरूणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करणाऱ्या तरूणाविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल मोतीराम अहिर (वय-४०) रा. गोळेगाव ता. बोदवड जि.जळगाव  हा हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. मला शिवीगाळ का करतो असा जाब गावातील शिवाजी शेषराव देशमुख याला विचारले असता सुनिल अहिर याला शिवीगाळ करून डोक्यावर काठी मारून गंभीर जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालीचरण बिऱ्हाडे करीत आहे. 

Protected Content