जळगाव प्रतिनिधी । भर रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला करण्यास सांगितल्याच्या रागातून तरूणाला दोन ते तीन जणांनी जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना जानकीनगरजवळ ८ नोव्हेंबर रोजी घडली. जखमी तरूणाच्या फिर्यादीवरून आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद भानुदास सोनार (रा.जानकीनगर) हा तरूण ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तुकाराम वाडीजवळी जानकी नगर जवळ दुचाकीने घरी जात असताना रस्त्यामध्ये एक मोटारसायकल लावलेली होती. आडवी लावलेली दुचाकी बाजूला करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने दोन ते तिन जणांनी दम देत’ हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का? असे सांगितल विनोदला भुषण उर्फ जांग्या समाधान बाविस्कर (वय-१९) रा. तुकाराम वाडी, निखील उर्फ बबल्या दिलीप गायकवाड (वय-१८) रा. एमएसईबी जुने पॉवर हाऊस आणि दादू (पुर्ण नाव माहित नाही) यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. भूषणने रस्त्यावर पडलेली वीट माझ्या डाव्या पायावर जोरात मारली. त्यामुळे जखमीवस्थेत विनोद दुचाकी घेऊन तेथून पळ काढत घरी पोहचला. परंतू घरापर्यंत भूषण उर्फ जांग्या, बबल्या, हे तिघे घरापर्यंत पळत आले. त्यानंतर त्यांनी घराजवळ विनोदला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर भूषणने डोक्यावर पुन्हा एकदा वीट मारली. भांडणाचा आवाज आल्याने आई-वडील घराबाहेर मला सोडवण्यासाठी आले, असता तिघांनी माझ्या वडिलांना देखील आता बुक्क्यांनी मारहाण करून आईला शिवीगाळ केली. त्यानंतर अनधिकृतपणे घरात घुसत असताना शिवीगाळ करत घरातील फ्रीज, फरशी, पाण्याचा माठ, अशा सामानाची तोडफोड करून नुकसान केले. खासगी उपचार घेतल्यानंतर आज विनोदच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील भुषण उर्फ जांग्या समाधान बाविस्कर (वय-१९) रा. तुकाराम वाडी, निखील उर्फ बबल्या दिलीप गायकवाड (वय-१८) रा. एमएसईबी जुने पॉवर हाऊस या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे हे करीत आहे.