किनगाव येथे हजरत मलंगशाह बाबा उर्स निमित्ताने कव्वालीचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव वेथील राष्ट्रीय एकात्मते प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध व असंख्य हिंदु मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मलंगशाह बाबा उर्स साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

 

किनगाव तालुका यावल येथील परिसरातील प्रसिद्ध असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांच्या दर्गावरील उर्स ( यात्रा ) यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटाच्या हद्दपार झाल्यानंतर प्रथमच मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.  सोमवार दि. १२डिसेंबर रोजी संदल कार्यक्रम होणार असून , मंगळवार दि. १३डिसेंबर रोजी ख्वाॅजा तेरी बस्ती मे रहेमत बरसती फेम मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल अजिम नाजा व फरूकाबाद कानपुर च्या प्रसिद्ध फनकारा करिष्मा ताज यांच्या जुगलबंदीचा भव्य असा कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  तरी पंचक्रोशितील सर्व धर्मिय भाविकांनी दर्गावरील दर्शन संदल व कव्वातीच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे किनगाव येथिल हिन्दु मुस्लीम एकता कमेटी , बिरसा मुंडा ग्रुप, तडवी साहेब ग्रुप, आर. एस. ग्रुप, न्यु फायटर ग्रुप, बेस्ट ईलेव्हन ग्रुप, शेरे सुलतान ग्रुप, हसमती ग्रुप, ग्रीन टायगर ग्रुप, सेवन स्टार ग्रुप, सरकार ग्रुप, किक ग्रुप आणि लब्बेक ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content