यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीअम निवासी पब्लीक स्कुलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा पातळीवरील संपन्न झालेल्या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धत नेत्रदिपक यश संपादन केले आहे.
जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय जळगाव व अमेचर् स्पोर्ट्स असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल जळगाव येथे दि.८ व दि.९ डिसेंबर रोजी जिल्हा स्तरीय उर्वरीत शालेय कीकबॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत जिल्ह्मातील विविध शाळेतील एकूण १७८ खेळाळूंनी यात सहभाग घेतला. यावल तालुक्यातील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक किनगाव येथील १४ व१७ वर्षा आतिल मुले व मुलींनी विजयी मिळविला यात १४ वर्षा आतिल वयोगटात विकास मनिराम बारेला -२४ किलाे वजन गट,सद्दाम हुसेन तडवी -३७ किलाे वजन गट,सविन सुरेश बारेला -३२ किलाे वजन गट व शिवराम सिताराम बारेला -४७ किलाे वजन गट या प्रमाणे सर्व खेडाळूंनी प्रथम क्रमांक मिळवला.
व मुलींनमध्ये अश्विनी शिवाजी बारेला या विद्यार्थीनीने -२४ किलाे वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच दि. ९ राेजी १७ वर्षा आतिल वयोगटात राेशन रमेश बारेला -४५ किलाे वजन गट व माना सत्तरसिंग बारेला या विद्यार्थ्याने -३५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना काेच तुषार जाधव सर व क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले तर इंग्लीश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील व्यवस्थापक पुनम पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व उप प्राचार्य राजश्री अहीरराव यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.