यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संशयित आरोपी योगेश समाधान कोळी रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव याने अल्पवयीन मुलीच्या मोबाईल क्रमांक मिळून संपर्क केला. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाता अल्पवयीन मुलगी बसस्थानकाजवळ असतांना योगेश कोळी याने माझ्यासोबत चल नाहीतर पळवून नेईल अशी धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी योगेश कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि जितेंद्र खैरनार करीत आहे.