यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे आदीवासी समाज संचलीत शाळा आणि इतर विविध ठीकाणी आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे.
किनगाव तालुका यावल येथे आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी आणी विठ्ठलरायचं मिलन घडून येणार असते या दिवशी परंपरेनुसार मागील पाच दशकापासुन भगवान विष्णुचे एकरूप समर्पित असलेल्या विठ्ठलाची मान्यवरांच्या हस्ते पंढरपुर तिर्थक्षेत्र येथे महापुजा केली जाते. महाराष्ट्र हा सण आषाढी एकादशी म्हणुन ओळखला जातो भाविक या शुभदिवशी उपवास करतात, या निमित्तानेअमीर प्रतिष्ठान संचलित के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कूल किनगाव तालुका यावल यांच्या वतीने येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल ,रुक्मिणी, वारकरी या वेशभूषा परिधान केल्या बाल दिंडी काढून आषाढी एकादशी च्या सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आदीवासी समाजव्दारे संचलितअमीर प्रतिष्ठान च्या अमीर पब्लिक स्कुल आणि अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगावचे संस्थेचे संचालक कार्यध्यक्ष सचिन तडवी व संचालक मंडळ शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वॄंद व विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. दिंडी कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ , मुख्याध्यापक गणेश मेश्राम यांच्यासह शिक्षक ,शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .